
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १७ सप्टेंबर पासून लागण्याची शक्यता
सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणूकीसाठीची अंचारसंहिता १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या वेळेस विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता 15 सप्टेंबरला लागू झाली होती. यंदा २९ सप्टेंबरला घट स्थापना होणार आहे. आचारसंहितेचा कार्यक्रम हा ४५ दिवसांचा असतो. निवडणूक आयोगाकडून आठवडाभराचा कालवधी दिला नवरात्रौत्सवाच्या शुभ मुर्हूतावर इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.