काल दिवसभरात राज्यात ४३ हजार १८३ नवीन करोनाबाधित वाढले
राज्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. मात्र तरी देखील करोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने, सरकारसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काल दिवसभरात राज्यात ४३ हजा १८३ नवीन करोनाबाधित वाढले असून, २४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील मृत्यू दर १.९२ टक्के आहे. तर, राज्यात काल रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
www.konkantoday.com