सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आंबोली (हिरण्यकेशी) क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हेक्टर क्षेत्रामध्ये ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसूचना आज महसूल व वन विभागाने प्रसिद्ध केली. तेजस ठाकरे व त्यांच्या टीमने या शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.
वन्यजीव संशोधकांनी ‘अॅक्वा’ या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्त्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशा प्रकारे हेरिटेजचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे.
www.konkantoday.com