
रत्नागिरी जिल्ह्यातही सायबर गुन्हे घडण्याची मोठी संख्या ,जनजागृती करुनही अनेकजणांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक
सामान्य जनतेची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून पोलिसांमार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे तरीदेखील रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठे आहे
दोन वर्षामध्ये जिल्ह्यात साेशल मिडियाच्या माध्यमातून ७६ जणांची फसवणूक झाली आहे. बनावट अकाऊंट, बँक ओटीपी, एटीएम पीन आदीची मागणी करून फसवणूक केली आहे. पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला आहे. त्यांच्या माध्यमातून जनजागृती आणि फसवणुकीच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यात आले आहे. दोन वर्षात ७६ पैकी केवळ सहा गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे उघड करण्यात चिपळण उपविभाग आघाडीवर आहे. रत्नागिरी, खेडने दोन वर्षात एकही सायबर गुन्हा उघड केला नाही. तर लांजा विभागातील पोलीस स्थानकांमध्ये एक गुन्हा उघड झाला आहे.
कोरोना महामारीच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या काळात जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहारावर भर देण्यात आला. त्याचा फायदा काही सायबर गुन्हेगार उठवित आहेत. नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांची फसवणूक सुरू आहे. पोलीस, बँकांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे जनजागृती सुरू आहे. तरी नागरिक आमिषाला बळी पडून फसवणूक करून घेत आहेत.
www.konkantoday.com