
हापूसची वाहतूक करण्यासाठी एस.टी. महांमडळामार्फत रत्नागिरी, सिंधुुदुर्गसाठी ५० मालवाहू ट्रक उपलब्ध होणार
एसटी महामंडळात आंबा वाहतूक करण्यासाठी सज्ज झाले आहे हापूसची वाहतूक करण्यासाठी एस.टी. महांमडळामार्फत रत्नागिरी, सिंधुुदुर्गसाठी ५० मालवाहू ट्रक पुरविण्यात येणार आहे. रत्नागिरीसाठी ३० तर सिंधुदुर्गसाठी २० ट्रक देण्यात येणार आहेत. दि. ५ एप्रिल ते ३१ मेपर्यंत आंबा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
यावर्षी एस.टी.ने आंबा वाहतुकीचा निर्णय घेतला आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण भागातून मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच इतर जिल्ह्यांमध्येही एसटी गाड्यांद्वारे आंबा वाहतूक करण्यात येणार आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल किंवा परळ कुर्ला नेहरूनगर पनवेल, ठाण्यामध्ये ठाणे-१ किंवा ठाणे-२, भिवंडी, बोरिवली-सुकुरवाडी किंवा कल्याण, पुणे पिंपरी-चिंचवड यासह सांगली, सातारा, कोल्हापूरला आंबा पाठविता येणार आहे.
आंबापेटी वाहतुकीसाठी ३०० किमीपासून ते १५०० किमीपर्यंत पाच डझन आंब्याच्या पुठ्ठ्याच्या बॉक्ससाठी ४० रुपयांपासून १९० रुपयांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत. तर लाकडी पेटीसाठी ५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येणार आहेत. दोन डझन पेटीसाठी २५ पासून ११० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
www.konkantoday.com