
कोविड-१९ अंतर्गत ऐच्छिक व परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीचे शुल्क ५०० रुपये करण्यात आले
कोविड-१९ अंतर्गत ऐच्छिक व परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीचे शुल्क ५०० रुपये करण्यात आले आहे. हे तपासणी शुल्क पूर्वी १००० रुपये इतके होते. मात्र, ते आता निम्मे करण्यात आल्याने कोेरोना चाचणी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये ऐच्छिक तपासणीशिवाय इतरांचीे मोफत कोरोना तपासणी करण्यात येते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, इतर राज्यात अथवा परदेशात कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरुवातीला शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना तपासणीसाठी १००० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, हे शुल्क कमी करण्यात येऊन आता ५०० रुपयांवर आणण्यात आले आहे.
www.konkantoday.com