डोंगरमाथ्यावर जाऊन अभ्यास करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्नाली मेस्त्री हिने पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष परीक्षेत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी डोंगरमाथ्यावर जाऊन अभ्यास करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्नाली मेस्त्री हिने पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष परीक्षेत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. भर पावसातही तिने डोंगरमाथ्यावर झोपडी बांधून अभ्यास सुरू ठेवला होता. तिच्या या मेहनतीची दखल घेत केंद्र सरकारने तिच्या घरी ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू करून दिली होती. केंद्र सरकारच्या मिळालेल्या मदतीचे तिने चीज केल्याची चर्चा परिसरात आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाउन झाले. यात मुंबईतून सणासाठी आलेली दारिस्ते येथील स्वप्नाली गावीच अडकली. ती मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षामध्ये शिकत होती.
www.konkantoday.com