
दापोलीत विनापरवाना लाकूड वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल.
दापोली वनविभागाने गस्तीवेळी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील मौजे टेटवली ते वाकवली मार्गावर विनापरवाना लाकूड वाहतूक करणार्यावर कारवाई केली. कारवाईत २३२३२ घ.मी. लाकूडसाठा जप्त करण्यात आला असून ट्रकसह १३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे.
ट्रकचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ६ रोजी सायंकाळच्या सुमारास मौजे टेटवली ते वाकवली मार्गावर गस्त घालत असताना एक ट्रक (एम.एच. ५० एन. १३२९) अकेशिया कामसर किटाची विनापरवाना वाहतूक करताना आढळला. त्याला ताब्यात घेतले असता २३२३२ घमी लाकूडसाठा असल्याचे आढळले. ट्रक व लाकूड मालासह १३ लाख ६० हजार रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.www.konkantoday.com वन