
सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण यांच्या वतीने, डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रा. लि., व चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने दुसरी प्लास्टिक भिशी
सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण यांच्या वतीने, डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रा. लि., व चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने दुसरी प्लास्टिक भिशी मंगळवार दिनांक ३० मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६वाजता संस्थेच्या मार्कंडी येथील कार्यालयात ऑनलाईन फेसबुक लाइव्ह द्वारे काढण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन सोडत संपूर्णपणे पारदर्शक स्वरुपात सर्वांना https://fb.me/e/e1FO2OgK8 या लिंकवर लाईव्ह बघता येईल.
सदर सोडतीमध्ये रुपये १०० ते रुपये १००० पर्यंत २० बक्षिसांचे नंबर काढण्यात येणार असून येणारे नंबर व बक्षिसे त्यावेळी जाहीर करण्यात येतील. विजेत्यांना आपली बक्षिसे बुधवार दिनांक ३१ मार्च पासून संस्थेच्या कार्यालयातून कुपन दाखवून घेऊन जाता येतील.
प्लास्टिक कचरा मुक्त चिपळूण संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत चिपळूण बाजारपेठ तसेच घरोघरी जाऊन प्रती किलो ५/- दराने ६०० किलो प्लास्टिक जमवण्यात आले असून ते रिसायकलिंगसाठी पाठवण्यात येणार आहे. प्लास्टिक कचऱ्यात टाकले जाऊ नये यासाठी चालू असलेल्या सदर प्रकल्पाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्रच्या वतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com