
आटो रिक्षा कल्याणकारी मंडळ सदस्य नोंदणीला अजूनही वेग नाही.
महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून रत्नागिरीच्या परिवहन कार्यालयात यासाठी सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत केवळ १८५ लोकांनी आपली नावे नोंदवली असून अधिकाधिक ऑटो रिक्षाचालकांनी नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्य सरकारने १६ मार्च २२०२४ रोजी एक शासन निर्णय जारी केला. त्या निर्णयात नमूद करण्यात आले की, या कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत तसेच राज्य शासनामार्फत राबवण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. हे मंडळ स्वायत्त व परिपूर्ण व्हावे, यासाठी शासनाकडून एकवेळ अनुदान रुपये ५० कोटी एवढी रक्कम उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले. ऑटो रीक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाबाबत नियमावली अद्याप तयार करण्यात आलेली नाही. लवकरच ती तयार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. www.konkantoday.com