
प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे-निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तींवर चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. पोलीस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारीच नाही, एकही पोलिस स्टेशन नाही कि जिथे पैसे जमा होत नाहीत, असे धक्कादायक दावा निवृत्त पोलीस अधिकारी बोरवणकर यांनी केला आहे
प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. राजकारणी लोकांना हव्या तश्याच नियुक्त्या होतात. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण गेल्यानंतर परिस्थिती बिघडत गेल्याचे बोरवणकर म्हणाल्यामहाराष्ट्र पोलीस प्रशासनात वाईट प्रवृत्ती वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसींग पुर्ण संपले आहे. महाराष्ट्राने केरळ, तेलंगणा या राज्यांकडून शिकावे, असा सल्ला बोरवणकर यांनी दिला. सर्व राजकीय पक्षांनी मिळून पोलीस दलाची रया घालवली आहे.
www.konkantoday.com