
राजीवडा येथे शासनाकडून तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काही स्थानिक नागरिकांनी केला विरोध , आरोग्य कर्मचाऱ्यांना परत पाठविले
काल राजीवडा परिसरात कोराेनाचा रुग्ण सापडल्याने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत सापडलेला रुग्ण व आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे तसेच संसर्ग होऊ नये म्हणून या परिसरातील लोकांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याप्रमाणे आरोग्य विभागाचे कर्मचारी राजीवडा येथे तपासणीसाठी गेले असता तेथील काही नागरिकांनी त्याला विरोध सुरू केला त्यामध्ये काही लोकप्रतिनिधींचाही समावेश होता आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणीकरता परत पिटाळण्यात आले त्यामुळे गंभीर वातावरण निर्माण झाले प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आता मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे ही साथ पसरू नये म्हणून आता स्थानिक नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असताना देखील अशा प्रकारच्या प्रकारामुळे प्रशासनाच्या समस्येत वाढ होत आहे
मात्र प्रशासनाकडूनही आता कडक कारवाई केली जात आहे त्यानंतर मोठ्या पोलिस बंदोबस्तात परत एकदा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे बंदोबस्तात आरोग्य पथके रवाना झाली आहेत
www.konkantoday.com