शासनानेच शाळा, तसेच अंगणवाडीच्या वीजबिलांचा भार उचलावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची करवसुली शंभर टक्के झालेली नाही. ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि नियमित इतर आवश्यक खर्चासाठी ग्रामनिधी पुरेसा नाही. शाळा, अंगणवाड्यांची बिले ग्रामपंचायतींनी भरावीत, असा निर्णय जिल्हा परिषद स्थायी समितीने घेतला असला तरी ग्रामपंचायतींकडे पैसे आहेत कोठे, असा सवाल करत ही बिले भरण्यास ग्रामपंचायतीनी नकार दिला आहे. शासनानेच वीजबिलोपाटीची रक्कम शाळा, तसेच अंगणवाडीच्या वीजबिलांचा भार उचलायला हवा, अशी मागणी हाेत आहे.
www.konkantoday.com