
मिरकरवाडा जेटीवरून चार लाख रुपये किमतीची पर्सनेटची जाळी चाेरली ,दोघांविरूध्द गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटीवर फिर्यादी शौकत मुकादम यांच्या मालकीची पर्सनेटची चार लाख रुपये किंमतीची जाळी चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे याबाबत आदिल फणसोपकर व काल्या खान या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिरकरवाडा येथील राहणारे फिर्यादी मुकादम यांनी आपली मिनी पर्स नेटची जाळी मासेमारी करताना फाटली म्हणून त्यानी समुद्रातून परत येऊन त्यानी ही जाळी जेटीवरील मुल्ला यांच्या लॉचवर ठेवली होती मात्र वरील दाेघा आरोपीनी ही जाळी चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पोलीस स्थानकात केले आहे
www.konkantoday.com