
परदेशात शेअरमार्केटमध्ये पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून चिपळुणात १८ लाखांची ऑनलाईन फसवणूक
परदेशात शेअरमार्केटमध्ये पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून व्हॉटसऍपवर लिंक पाठवत त्याद्वारे १७ लाख ९८ हजार ३७७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारा परकार (पूर्ण नाव, गाव माहित नाही) असे त्या महिलेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद लियाकत महमद सालेह परकार (४८, गोवळकोट) यांनी दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाय लियाकत परकार व सारा परकार यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. सारा हिने लियाकत परकार यांना परदेशात शेअर मार्केटमध्ये पैसे मिळवण्याचे आमिष दाखवत मोबाईल व्हॉटसऍपवर लिंक पाठवून लियाकत यांना माहिती भरण्यास सांगितली. तसेच काही दिवसांनी लियाकत यांनी त्या अकाऊंटद्वारे ट्रेडिंग केले असता त्यामधील युएसटीडी रक्कम मिळवण्यासाठी लियाकत यांनी सारा हिने ट्रेडिंग चार्जेस पे व टॅक्स भरण्यास सांगितले. १२ ते १६ एप्रिलदरम्यान बँक, चिपळूण या खात्यावरून आरटीजीएसद्वारे पहिल्यांदा ९ लाख ५८ हजार १४१ रुपये व दुसर्यांदा ८ लाख ४० हजार २३६ रुपये असे एकूण १७ लाख ९८ हजार ३७७ रुपये सारा हिच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यावर पाठवले. त्यामुळे लियाकत यांच्या युएसडीटी अकाऊंटमधील सारा हिने लियाकत यांची १७ लाख ९८ हजार ३७७ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. www.konkantoday.com