
कोकण रेल्वेच्या प्रशासनाचा फटका प्रवाशांना, जनशताब्दीच्या आरक्षणाचा घोळ सुरूच.
जनशताब्दी एक्सप्रेसच्या आरक्षणाचा घोळ अद्यापही सुरूच आहे. कोकण रेल्वे प्रशासनाच्या चुकीचा फटका प्रवाशांना बसत आहे. बुकींग करताना कन्फर्म दर्शविणारे तिकिट ऐन प्रवासावेळी वेटींग दिसत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. असाच मनस्ताप ऐन गणेश चतुर्थीच्या गर्दीच्या हंगामात सहन करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा कोकण रेल्वे प्रशासनाच्या अशा अनागोदी कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे.कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेसचे ४ नोव्हेंबर रोजीच्या प्रवासाचे एका महिला प्रवाशाने कुडाळहून पनवेलपर्यंत सेकंड सिटिंग तिकिट अधिकृत आयआयसीटीसीच्या साईटवरून ऑनलाईन बुक केले. या तिकिटाचे स्टेस कन्फर्म दिसत असल्याने महिला प्रवासासाठी निर्धास्त होती. मात्र ऐन प्रवासावेळी कन्फर्म दिसणारे स्टेटस वेटिंग दिसून लागल्याने महिलेला मनस्ताप सहन करावा लागला. www.konkantoday.com