सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे दिवास्वप्न शिवसेनेने पाहू नये-राजन तेली
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे दिवास्वप्न शिवसेनेने पाहू नये. भाजपचे सर्व सदस्य एकसंघ आहेत. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्याची गरज नाही. उलट शिवसेनेच्या गोटात अस्थिरता असल्याने भाजपच्या सदस्य संख्येत वाढ झाली तर आश्चर्य वाटू नये, असा सूचक इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिला
www.konkantoday.com