
मुंबई जातीय दंगल /बॉम्ब स्फोटामधील मृत व्यक्तींच्या वारसांना आवाहन
रत्नागिरी, दि. 28 (जिमाका): मुंबई सन 1992-93 साली झालेल्या जातीय दंगलीत/बॉम्ब स्फोटात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रलंबित आर्थिक मदत देण्यासाठी त्यांच्या वारसांनी 1 महिन्याच्या आत नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर, रुम नं. १०३, पहिला मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगत सिंग रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१, हेल्पलाईन क्र. 022-22664233 अथवा नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, शासकीय वसाहत, चेतना कॉलेज समोर, वांद्रे (पु), मुंबई 400 051. अथवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधी व सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांकडून करण्यात आले आहे. नजिर दाऊद लांबे, पो. सैतवडे, जि. रत्नागिरी, राजू तनु कपले, शिरवाने, ता. दापोली, जि. रत्नागिरी, मुजीब इब्राहिम मोडक, पो. कडवई, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी या मृतांच्या वारसांनी वरील पत्त्यावर संपर्क करावा. 000