
माजी नगरसेवक दादा शिगवण यांचे निधन
दापोली नगर पंचायतीचे माजी नगरसेवक, आर. व्ही. बेलोसे फाऊंडेशनचे विद्यमान सभापती व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवाजी उर्फ दादा शिगवण यांचे निधन झाले आहे. दादा शिगवण हे पंचायत समितीमध्ये कृषी विभागामध्ये नोकरीवर होते. मात्र त्यांचा सामाजिक पिंड त्यांना या नोकरीत स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ नेते कै. उदय तथा बाळासाहेब बेलोसे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसचे काम सुरू केले. दादा शिगवण यांनी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा दापोलीचे माजी अध्यक्ष म्हणून काम करताना कुणबी समाजातील अनेक वादविवाद सोडवले. दापोली तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक, दापोली नगर पंचायतीचे माजी नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे.
www.konkantoday.com