रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर, काही शहरांमध्ये लॉकडाउन सुरू करावं लागेल-आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधितांबरोबरच मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषद घेऊन, रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर, काही शहरांमध्ये लॉकडाउन सुरू करावं लागेल, असा सूचक इशारा देखील दिला आहे. दरम्यान, काल दिवसभरात राज्यात २४ हजार ६४५ नवीन करोनाबाधित आढळले असून, ५८ रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१३ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण २,१५,२४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
www.konkantoday.com