
कोरोना लसीमुळे आतापर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही -केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन
कोरोना लसीमुळे आतापर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी सीएसआयआर-सीएसआयओ चंदीगड येथे सेंटर फॉर एक्सलन्स फॉर इंटेलिजेंट सेन्सर अँड सिस्टिम्स येथे माध्यमांशी संवाद साधला. कोरोना लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. लसीकरणामुळे आतापर्यंत कुणाचा मृत्यू झालेला नाही. ज्या मृत्यूची नोंद झाली आहे, तज्ञांच्या पथकाद्वारे राष्ट्रीय पातळीवर चौकशी केली जाते, असं हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे
www.konkantoday.com