
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव निश्चित?
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासह विषय समिती सभापतिपदाची निवड आज सोमवारी होणार आहे. अध्यक्षपदासाठी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात सुरू होती. विषय समिती सभापतिपदांमध्ये चंद्रकांत मणचेकर, परर्शुराम कदम, रेश्मा झगडे, देवयानी झापडेकर यांची नावे पुढे आली आहेत.अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू अरुण उर्फ अण्णा कदम, बाळशेठ जाधव, विक्रांत जाधव, उदय बने ही चार नाव चर्चेत होती. निवडीपूर्वी दोन नावे मागे पडली होती. शेवटच्या टप्प्यात बने की विक्रांत जाधव अशी चुरस होती.
राष्ट्रवादीतून सेनेत दाखल झालेले आमदार भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी सुपुत्र विक्रांत यांना संधी देण्यावर मातोश्रीवरुनच आदेश असल्याची चर्चा आहे
www.konkantoday.com