
महाराष्ट्रात चार कोंबड्या व दोन कावळे विजेच्या शॉक लागून मेले, तरी केंद्र सीबीआय किंवा एनआयए पाठवेल”, -शिवसेनेची टीका
परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’वरून शिवसेनेनं भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्रात चार कोंबड्या व दोन कावळे विजेच्या शॉक लागून मेले, तरी केंद्र सीबीआय किंवा एनआयए पाठवेल”, असा टोलाही शिवसेनेनं मोदी सरकारला लगावला आहे.
सचिन वाझे यांना हटवून काय फायदा? पोलीस आयुक्तांना हटवा” अशीच भाजपाची मागणी होती. आता त्याच परमबीर सिंग यांना खांद्यावर घेऊन भाजपावाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान होऊन नाचत आहेत. हा राजकीय विरोधाभास आहे. परमबीर सिंग यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा उद्रेक समजू शकतो, मात्र शासनाच्या सेवेत अत्यंत वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्तीने असा सनसनाटी पत्रोपचार करणे नियमात बसते काय? गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहायचे व ते प्रसिद्धी माध्यमांना पोहोचवायचे हे शिस्तीत बसत नाही.
www.konkantoday.com