राजापूरचे मनसेचे तालुकाध्यक्ष राजेश पवार यांचे पक्षातून निलंबन
राजापूर येथील नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राजेश पवार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षातून निलंबित करण्यात आले आहे तसे पत्र महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे राज्य सचिव मारुती मोरे यांनी दिले आहे पवार यांचे निलंबन कशामुळे केले याचे कारण पत्रात दिले नसले तरी कालच पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचे निलंबन झाले असावे असा अंदाज आहे
कालच मनसेचे तालुकाध्यक्ष राजेश पवार यांनी पत्रकार परिषदेत रिफायनरीला स्थानिकांचा विरोध असेल तर मनसेचा विरोध कायम असेल असे म्हटले होते त्यांनी राज ठाकरे यांची भूमिका मांडताना हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये अशी त्यांची भूमिका असल्याचे म्हटले होते याचा अर्थ हा प्रकल्प राजापुर तालुक्यात व्हावा असे नाही असा निष्कर्ष पवार यांनी काढला होता जर स्थानिक जनतेचा रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर विरोध असेल तर मनसे जनतेच्या मागे उभे राहील असे वक्तव्य केले होते
www.konkantoday.com