पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरीचा राष्ट्रीय कोडिंग आणि रोबोटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये दमदार कामगिरी

रत्नागिरी, दि. १२ एप्रिल २०२५ : पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी आयआयटी दिल्ली येथे आयोजित २९ व ३०मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय कोडिंग आणि रोबोटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील उत्तम प्रतिभावंतांशी लढत देत रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी यशाची पताका फडकवली.

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चार संघांनी, म्हणजेच एकूण १६ हुशार विद्यार्थ्यांनी, रोबोटिक्स आणि कोडिंगच्या क्षेत्रात आपली कौशल्ये सादर केली. यातील PIS_Team 3 ने कोडिंग हॅकाथॉन श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या संघात कु.अभिषेक प्रसाद , कु.रौनक चौबे , कु.साई झगडे आणि कु.अंचित दिवेकर यांचा समावेश होता. त्यांच्या या यशाने रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरीची नोंद झाली आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, समर्पण आणि तांत्रिक कौशल्य यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या यशाने शिक्षक आणि पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांना या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तयार केले.

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासनाने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. “आमच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे हे यश भविष्यातील नव्या संधींसाठी प्रेरणा देणारे आहे,” असे शालेय प्रशासनाने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button