
गेले आठ महिने सुरू असणार्या एसटी मालवाहतुकीतून चिपळूण आगाराची ३३ लाखांची कमाई
खासगी वाहतुकीशी स्पर्धा करत एसटी विभागाने सुरू केलेल्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे गेले आठ महिने सुरू असणार्या एसटी मालवाहतुकीतून तब्बल ३३ लाख ३१ हजार ९०० रुपयांचे उत्पन्न चिपळूण आगाराला मिळाले आहे. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत या उत्पन्नाची भर पडल्याने ही मालवाहतूक एस.टी. महामंडळासाठी फायद्याची ठरू लागली आहे.
चिपळूण तालुक्यात या मालवाहतुकीला छोटे मोठे व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ महिन्यात ७६ हजार ६७० कि.मी. चे अंतर कापत या मालवाहतूक करणार्या बसेसने तब्बल ३३ लाख ३१ हजार ९०० रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
www.konkantoday.com