
मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चेची राजकीय वर्तुळात चर्चा
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या भेटीत उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पूरग्रस्तांसाठी मदतीचा चेक देण्यासाठी पोहोचलेल्या प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यामुळे दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी चर्चा सुरु आहे दरम्यान दरेकर यांनी चर्चेबाबत जाहिर सांगण्यासारखे काही नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे
www.konkantoday.com