
संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांचे वतीने नेत्र शिबीराचे आयोजन
रत्नागिरी जिल्ह्यातील एनजीओ संपर्क युनिक फाउंडेशन व नंदादीप नेत्रालय, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत नेत्र शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे *1980 पासून नेत्र विभागात कार्यरत असलेले हे नेत्रालय रत्नागिरी शहरात असून सामाजिक भान ठेवून असे शिबीर अनेक ठिकाणी आयोजित ते करीत असतात.या शिबीरात डोळे संबंधित सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार असून जर कोणाला काही डोळे संबंधी आजार असेल तर त्याचे ही मार्गदर्शन करण्यात येणार आहे
हे शिबीर संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी, एनजीओ यांचे कार्यालयात होणार आहेशिबीराचे ठिकाण .. शॉप नंबर 1 मिस्त्री हायस्कूल गेट जवळ गोगटे कॉलेज नजीक रत्नागिरी
तरी या संधीचा जास्तीत जास्त फायदा नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी व नंदादीप नेत्रालय रत्नागिरी यांचे वतीने करण्यात आले आहे*
टीप== कोरोना संक्रमण असल्याने प्रत्येक व्यक्तीने मास्क घालते अत्यावश्यक असून या शिबिरात शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com