
दिव्यांगांनी घेतली, गगन भरारी…..
रत्नागिरी ः आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकण पाहतो. पण सर्वांच्याच नशिबी ते शक्य नसते. ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक अडचणी येतात अशा दिव्यांग बांधवांना विमान प्रवास म्हणजे दुरापास्तच. दुर्गाशक्ती सामाजिक चळवळ..अशोक भुस्कुटे परिवार आयोजित, विमान प्रवास सहल उत्साहात संपन्न. दुर्गाशक्ती, अपंग क्षेत्रात, ‘अपंगांची काठी’ अशी बिरुदावली अभिमानाने बाळगते. सर्व दुर पसरलेल्या जिल्ह्यातील, जे स्वतःच्या पायावर उभे राहु शकत नाहीत अशा निवडक, ९ दिव्यांगांना, या वर्षी, मुंबई – हैदराबाद असा प्रवास घडवण्यात आला. जिल्ह्यातील, मध्यवर्ती चिपळूण मधून रात्री १२.०० वाजता, टेंपो ट्रॅव्हलरने व्हिलचेअर्ससह, सकाळी ८.०० वा. मुंबई विमानतळ. आणि… दुपारी ११.०० वा. विमान, हैदराबाद च्या दिशेने झेपावले. अवघ्या सव्वा तासात, हैदराबाद विमानतळावर दाखल झाले. रात्रीच्या मुक्कामासाठी टॅक्सी ने मुग्धा शाह यांच्या निवासस्थानी पोहचले. रात्री एकमेकांची ओळख व आयोजक दांम्पत्यापैकी अश्विनी भुस्कुटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी रामोजी फील्म सिटी. १९६६ एकरात वसलेली, रामोजी फील्म सिटी तील भव्यदिव्य सेट्स बघून, विशेषत: बाहुबलीचे सेट्स बघून,दिव्यांगांच्या डोळ्याचे पारणेच फीटले. परतीच्या प्रवास रेल्वेतून करत या बांधवांनी रेल्वे प्रवासाचाही अनुभव घेतला. सहलीत, मुस्कान सादीक नाकाडे, रत्नागिरी, अनिल रामचंद्र रघुवीर. पाज पंढरी, भागिरथी अनंत पाटील. पाज पंढरी, पवन विलास जाधव. चिखली, विजया रामकृष्ण पटवर्धन. पेढे परशुराम, वर्षाराणी श्रीपत सावंत. निर्व्हाळ. नितीन गोविंद जानस्कर. ओणी, अजय सदाशिव नारकर. पाचल, सिध्दार्थ पांडुरंग तबीब, बाणकोट, या दिव्यांगांनी सहभाग नोंदवला. विमान प्रवास तिकीट, रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष दिनेश पोतनीस यांनी प्रायोजित केले. सहल यशस्वी होण्यासाठी, अशोक विठ्ठल भुस्कुटे, अश्विनी अशोक भुस्कुटे,समिर करीम नाकाडे, मुग्धा शाह,दुर्गा,ओम यांनी विशेष परिश्रम घेतले.