
वाचन संकल्प महाराष्ट्राचा शासकीय विभागीय ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
रत्नागिरी, दि.30 :- उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत 30 व 31 डिसेंबर रोजी शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
01 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत वाचन पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी/विद्यार्थींनी, स्थानिक वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, दि.भा.झोडगे यांनी केले आहे.