माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा २३ रोजी षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा

गुहागर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार डॉ. विनय श्रीधर नातू यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने डॉ. विनय नातू फॅन क्लबच्यावतीने मार्गताम्हाने येथील शिर्के मंगल कार्यालयात २३ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत षष्ठ्यब्दीपूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजकारण विरहीत पार पडणार्‍या या अभिष्टचिंतन सोहळ्यात महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्ययात आले आहे.या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार्‍या सर्व महिला भगिनींना डॉ. विनय नातू फॅन क्लबच्यावतीने भेटवस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमातील अंतिम विजेत्या भगिनीला मानाची पैठणी आणि सोन्याची नथ देवून गौरवण्यात येणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button