
काल राज्यात सर्वाधिक २ हजार ३४७ रुग्णांची वाढ
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ३३ हजारांच्या पार पोहोचला आहे. काल राज्यात सर्वाधिक २ हजार ३४७ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३ हजार ०५३ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत काल १हजार ५९५ रुग्णांची नोंद करण्यात आली राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३३ हजार ०५३ पर्यंत पोहोचला आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार १५० वर पोहोचला आहे.
www.konkantoday.com