देवरुख पोलिसांनी चोरट्यांना १५ कि.मी. पाठलाग करून पकडले,पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
देवरूख शहरातील एचपी गॅस एजन्सीचे मालक पुष्पर राजेंद्र पाटोळे यांच्या गळ्यातील चेन सोनसाखळी, मोबाईल असा ऐवज लंपास करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी १५ किमीचा पाठलाग करून पकडले आहे. राजस्थान येथील धर्माराज उर्फ कोजाराम विष्णोई, हिराराम विष्णोई अशी त्यांची नावे असून या चोरट्यांना पकडणार्या देवरूख पोलिसांवर सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
शिवाजी चौकातील गॅस एजन्सीचे काम आटोपून पुष्पर पाटोळे रात्री १ वाजण्याच्या सुमारास मराठा कॉलनी येथील निवासस्थानी जात होते. लपलेल्या दोन्ही युवकांनी पुष्पर यांना मारहाण करूनत्यांच्याकडील सोनसाखळी, मोबाईल घेवून पलायन केले. पुष्पर पाटोळे यांनी रात्रीच देवरूख पोलीस स्थानकात जावून झालेल्या घटनेची तक्रार नोंदविली होती.त्यानंतर पोलिसांनी झटपट कारवाई केली
www.konkantoday.com