
अधिकारी, कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी रत्नागिरी जि.प. भवनात दवाखाना सुरू
_रत्नागिरी जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामानिमित्त येणार्या ग्रामस्थांसाठी जिल्हा परिषद भवनात दवाखाना सुरू केला आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकरण पूजार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या दवाखान्याचे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ अशी आहे.याप्रसंगी जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, रत्नागिरी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव तसेच सर्व खाते प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.www.konkantoday.com