तर मुंबईतील सर्व मच्छीमार संस्थांना सोबत घेऊन एक हजार नौका समुद्रात उतरवू -मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख
माझी बांधिलकी ही माझ्या मच्छीमार बांधवांशी आहे. तेल आणि नैसर्गिक वायुमंडळामार्फत (ओएनजीसी) होणाऱ्या भूगर्भ सर्वेक्षणामुळे माझा मच्छीमार बांधव जर उद्ध्वस्त होणार असेल तर मुंबईतील सर्व मच्छीमार संस्थांना सोबत घेऊन एक हजार नौका समुद्रात उतरवू. सर्वात पुढच्या नौकेत उभा राहून मी स्वत: या आंदोलनाचं नेतृत्व करीन”, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात राज्य सरकारचा मत्स्यव्यवसाय विभाग विरुद्ध ओएनजीसी पर्यायाने केंद्र सरकारमध्ये टोकाचा संघर्ष पहायला मिळेल, अशी चिन्ह आता दिसू लागली आहेत.
www.konkantoday.com