पोलीस अधिकारी सचिन वाझे मुंबई पोलीस दलातून निलंबित
वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयने त्यांना मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील कारमधील स्फोटक प्रकरणात शनिवारी रात्री उशिरा अटक केली. या कारवाईनंतरच सचिन वाझेंचे पोलीस दलातून निलंबन होणार असे बोलले जात होते. अखेर आज सोमवारी सचिन वाझेंचे निलंबन करण्यात आले आहे. सचिन वाझेंचे दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. यापूर्वी २००३ मध्य ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझेंचे निलंबन झाले होते.
www.konkantoday.com