
विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्याला अटक
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेच्या वस्तूंचा वाहतुकीला परवानगी दिलेली आहे असे असतांना एका वाहनचालकाने सेवेच्या पासचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे शुक्रवारी रात्रीची चिपळूण येथे पोलीस गस्त घालीत असताना चिपळूण सती येथे अशोक लेलँड या मालवाहतुकीच्या गाडीमधून अठरा प्रवाशांची वाहतूक करत असतानाचा प्रकार उघड झाला या चालकांकडे केवळ अत्यावश्यक मालाच्या वाहतुकीचा परवाना असताना देखील तो प्रवासी वाहतूक करीत होता पोलिसांनी गाडी जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com