सिंधुदुर्गात मत्स्यविभागाच्या गस्ती नौकेला परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांनी घेरत हल्ला करण्याचा प्रयत्न
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुरू असलेल्या एलईडी व पर्ससीन नेट मच्छीमारी विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कारवाईसाठी समुद्रात गेलेल्या सहायक मत्स्यविभागाच्या गस्ती नौकेला परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांनी घेरत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री वेंगुर्ले निवती रॉक परिसरात १६ वाव समुद्रात घडली.
www.konkantoday.com