महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला काल पासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने हे अभियान सुरु राहणार आहे. स्वत: राज ठाकरे यांनी काल शिवाजीपार्कमध्ये कुटुंबीयांसोबत या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली. या सदस्यनोंदणी अभियानाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील लोकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले. पुढच्यावर्षी २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक ताकत आणि जनाधार भक्कम करण्याच्या दृष्टीने या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झालीय.
www.konkantoday.com