
शिक्षकांचा वेतन अनुदानाचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने शिक्षक समन्वय संघाकडून परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा
महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांचा वेतन अनुदानाचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने शिक्षक समन्वय संघाकडून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा,व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल/मे २०२१च्या संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.या विषयीचे निवेदन शिक्षक समन्वय संघाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री याना देण्यात आले आहे.शिक्षक समन्वय संघाचे २९ जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.
www.konkantoday.com