रत्नागिरी जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय
रत्नागिरी जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा या सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे. या बाबत जि. प.चे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. सकाळी ७:३०ते सकाळी ११:३०वाजेपर्यंत शाळा भरण्यात येतील, असे पत्र शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे.
वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी प्राथमिक शाळांमध्ये येणार्या ग्रामीण भागातील मुलांची गैरसोय लक्षात घेऊन जि. प. शिक्षण विभागाकडून शाळा सकाळच्या वेळी भरविण्याचे आदेश काढले आहेत.
www.konkantoday.com