
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नरेंद्र महाराज संस्थान सरसावले
रत्नागिरी:कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात पुराने हाहाकार उडविल्याने अनेक ग्रामस्थ, वाहने व प्रवासी अडकून पडले होते. अशा लोकांच्या मदतीसाठी नाणिज येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्यावतीने वाठार, वाघवाडी, मसूर या तीनठिकाणी ऍम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली होती. अडकलेल्यांची चौकशी करून त्यांना वैद्यकीय सुविधा मिळवून दिल्या जात होत्या. तसेच जास्त आजारी असणार्या लोकांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍम्बुलन्समार्फत हलविण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मदतीसाठी धावलेल्या संस्थानच्या कार्याचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com