मेडिकल कॉलेजबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांनी आधी त्याचा अभ्यास करावा-उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
मेडिकल कॉलेजबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांनी आधी त्याचा अभ्यास करावा आणि नंतर बोलावे. केंद्र शासनाच्या बृहत् आराखड्यात रत्नागिरीचे नाव नसले तरी विशेष बाब म्हणून रत्नागिरी मेडिकल कॉलेज उभारणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विरोधकांनी समोर बसून चर्चा करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.
केंद्र शासनाच्या बृहत् आराखड्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजचे नाव नाही; मात्र राज्यासाठी मेडिकल कॉलेज कसे करतात, त्याचा अभ्यास करायला हवा. त्यासाठी विधिमंडळात माहिती घेतली पाहिजे. अपूर्ण माहिती घेऊन विरोधकांनी बोलू नये. जसे बार कौन्सिल आले तसे मेडिकल कौन्सिल आहे. त्यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला मंजुरी मिळेल. शिवसेनेने शब्द दिला म्हणजे रत्नागिरीत मेडिकल कॉलेज होणार,आहे.
www.konkantoday.com