
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांची नावे पुढे
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समिती सभापतिपदासाठी २२ मार्चला निवडणूक होणार आहे. पदासाठी दावेदार असलेल्या इच्छुकांनी आपले पत्ते सरकवण्यास आरंभ केला आहे. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू अरुण उर्फ अण्णा कदम, आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव, चिपळूणचे बाळशेठ जाधव तर ज्येष्ठ सदस्य उदय बने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
www.konkantoday.com