शिवसेनेच्या मागणीवरून बदली झालेल्या खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीवरून महा विकास आघाडीत मतभेद, काँग्रेस व राष्ट्रवादीचा विरोध

0
33

शिवसेनेच्या मागणीवरून बदली झालेल्या खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीवरून स्थानिक पातळीवर महाविकासआघाडीत मतभेद उघड झाले आहेत पत्की यांच्या बदलीला काँग्रेस व राष्ट्रवादीने विरोध केला आहे
खेड पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदली वरून राष्ट्रवादी काँग्रेस आता पुढे सरसावली असून खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चुकीचा निर्णय घेत असल्याची तक्रार केली आहे.
राष्ट्रवादीच्या खेडच्या जिल्हा परिषद सदस्य नफिसा हशमत परकार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना लेखी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख हे कसलाही विचार न करता निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.
खेडच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की या चांगले काम करत असून कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पडता चांगल्या प्रकारे तालुका सांभाळत आहे.
शिवसेना नेत्यांनी संगितलेली काम न केल्याने त्यांच्यावर राग ठेवून त्यांनी विधानपरिषद मध्ये प्रश्न उपस्थित केला.असा त्यानी आरोप केला आहे राष्ट्रवादी पाठोपाठ खेडमध्ये काँग्रेस ही पत्की यांची बाजू घेण्यासाठी सरसावली आहेमाजी खासदार व काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्ण पत्की यांची बदली न करण्याची मागणी केली आहे.
सुवर्णा पत्की सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची खेडला गरज असून त्यांना खेड तालुक्यातील ठेवण्याची मागणी या पत्राद्वारे काँग्रेसने केली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here