आधी मोबदला द्यावा मगच गावातील रूंदीकरण हातीघ्यावे,गुहागर-विजापूर महामार्ग रूंदीकरणाला मार्गताम्हानेतही विरोध
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाविरोधात चिपळूण तालुक्यातील उमरोली येथील प्रतिष्ठीत उद्योजक न्यायालयात गेले असतानाच आता मार्गताम्हाने येथील ग्रामस्थही एकवटले आहेत. मार्गताम्हाने पंचक्रोशी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी आधी मोबदला द्यावा मगच गावातील रूंदीकरण हाती घ्यावे, असा इशारा दिला आहे. तसेच आपल्या मागणीसाठी न्यायालयीन लढा उभारण्यासाठी एकत्र या असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले आहे. त्यामुळे रामपूर ते मार्गताम्हाने भागातील रस्ता रूंदीकरण वादात सापडले आहे.
www.konkantoday.com