रत्नागिरीत ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन  २२ व २३ मार्च रोजी आयोजन; डॉ. भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती.

रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रत्नागिरीत २२ व २३ मार्च रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आह़े या धम्मपरिषदचे उद्घाटन व चर्चासत्र २२ रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील गिरीरत्न हॉटेल सभागृह येथे होईल, तर २३ रोजी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे खुली धम्मपरिषद होणार आहे. कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉ. हरिश रावलीया व रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड. सुभाष जौंजाळे यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.   

 रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या गिरीरत्न हॉटेल येथे २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन व भन्ते ए सुमेधबोधी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. दुपारी १२ वाजता भारतीय संविधान या विषयावर संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. जगदीश गवई यांचे मार्गदर्शन, १ वाजता भोजन, २ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतीमान कशी करावी या विषयावर राष्ट्रीय सचिव वसंत पराड यांचे मार्गदर्शन, ३ वाजता भारतीय रूढी-परंपरा आणि विज्ञान या विषयावर राज्य सरचिटणीस अशोक केदारे यांचे मार्गदर्शन, ४ वाजता बौद्धांचे धार्मिक विधी संस्कार काय करावे व काय करू नये याविषयी शंका समाधान व निरसन तर ६.३० ते ८ वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे भन्ते ए सुमेधबोधी यांची जाहीर धम्मदेसना होणार आहे.  २३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणाहून प्रमोद महाजन क्रीडा संकुल मैदान अशी भिक्खू संघाची धम्म रॅली, प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथील धम्मपरिषदच्या ठिकाणी सकाळी ११ वाजता आदर्शांच्या प्रमिमांचे पूजन, भन्ते ए सुमेधबोधी यांच्याकडून त्रिसरण पंचशील ग्रहण व मान्यवरांचे स्वागत व सत्कार, प्रमुख मार्गदर्शक व पुज्य भन्ते ए सुमेधबोधी यांची धम्मदेसना दुपारी ३ वाजता भोजनदान असे आयोजन करण्यात आले आहे.

धम्मपरिषदेसाठी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस. के. भंडारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस. एस. वानखेडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमा पवार, राष्ट़ीय सचिव बी. एच. गायकवाड, भिकाजी कांबळे, यु. जी. बोराडे, प्रशांत गडकरी, जयवंत लव्हांडे आदी उपस्थित राहणार आहेत.

   जास्तीत जास्त लांकांनी या धम्मपरिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा सरचिटणीस एन. बी. कदम, कोषाध्यक्ष प्रदीप जाधव, उपाध्यक्ष विजय जाधव, डॉ. जनार्दन माहिते, शरणपाल कदम, राजापूर तालुकाध्यक्ष सत्यवान जाधव, लांजा तालुकाध्यक्ष आर. बी. कांबळे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष विजय मोहिते, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राहूल मोहिते, चिपळूण तालुकाध्यक्ष जयरत्न कदम, गुहागर तालुकाध्यक्ष विद्याधर कदम, खेड तालुकाध्यक्ष अ. के. मोरे, दापोली तालुकाध्यक्ष अनिल धाडगे, मंडणगड तालुकाध्यक्ष हर्षद जाधव, तुषार जाधव, अंनत जाधव, राहुल पवार, भगवान जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button