रत्नागिरी शहरात लवकरच अत्याधुनिक अशा ऑफिसर क्लबची निर्मिती होणार

0
41

मुंबई-पुण्याच्या धर्तीवर रत्नागिरी शहरात लवकरच नागरिकांना एकत्र खेळापासून अन्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑफिसर क्लबची निर्मिती होणार असून यासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले
शहरातील लोकांना विरंगुळ्यासाठी व करमणुकीसाठी एकत्रित वेळ घालवण्यासाठी फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. याचा विचार करून रत्नागिरी शहरात करमणुकीसाठी या ऑफिसर क्लबची निर्मिती केली जाणार आहे. सध्या असलेल्या जुना माळ नाका येथील पाण्याच्या टाकीजवळ अल्पबचत हॉलजवळ हा क्लब उभारण्यात येणार आहे.
चारमजली असलेल्या या क्लबमध्ये इनडोअर बॅडमिंटन, जिम्नॅशियम, बिलियर्ड, चेस, कॅरम, योगा, मेडिटेशन सेंटर, डान्स, पेंटींग, म्युझिक, क्राफ्ट आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. याशिवाय आऊटडोअरमध्ये लॉन टेनिस, स्विमिंग पुल, चिल्ड्रेन पार्क, जॉगिंग टॅॅ्रक आदी उपलब्ध राहणार आहे. याशिवाय क्लबमध्ये येणार्‍यांसाठी रेस्टॉरंट, कॉन्फरन्स हॉल, एमपी थिएटर देखील उभारण्यात येणार आहे. यासाठी मेंबरशीप ठेवण्यात येणार असून अंदाजे ३०० लोकांसाठी लाईफ मेंबरशीप देण्यात येणार आहे. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफीसर, नॉन गव्हर्नमेंट मेंबर, तसेच कॉर्पोरेट मेंबर ठेवण्यात येणार आहे. गव्हर्नमेंट लाईफ मेंबरसाठी १ लाख २० हजार, नॉन गव्हर्नमेंट मेंबरसाठी ३ लाख व कॉर्पोरेट लाईफ मेंबरसाठी ४ लाख ८० हजार मेंबरशीप ठेवण्यात आली असून दरवर्षी २० हजार सर्व्हिस फी ठेवण्यात आली आहे.
या क्लबचा आराखडा तयार करण्यात आला असुन याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली असून अन्य मार्गानेही निधी उपलब्ध केला जाणार आहे. याशिवाय या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनबरोबरही चर्चा सुरू असून त्यांच्या ऍक्टीव्हीटी येथे सुरू करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here