कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशी प्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याला खडे बोल सुनावले

0
26

कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा रुद्रावतार नुकताच सभागृहात पाहायला मिळाला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशी प्रकरणात त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्याला खडे बोल सुनावले. शिवसेनेचा मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत आहे. मला विधानभवनाच्या गेटवर उभे राहून आंदोलन करायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. यावेळी रामदास कदम यांनी म्हटले की, कदम म्हणाले की, कोरोना काळात देवळे आणि शाळा बंद आहेत. पण, रत्नागिरीत दिवसरात्र क्रिकेटला कशी परवानगी मिळते. हजारोंची गर्दी होते. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की शासकीय अधिकारी असून त्यांचे फोटो बॅनरवर लागले. हजारोंच्या गर्दीमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्या उपस्थित होत्या. कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत फोटोसह गृहमंत्र्यांना सहावेळा पत्र दिले. पण, त्यांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही. शिवसेनेचे गृह राज्यमंत्री असूनही तेही या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहेत.विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्या मंत्र्यांचे नाव जाहीर करण्याचे आवाहन केले. यावर, नोटीस देऊन मी त्या मंत्र्याचे सभागृहात नाव घेऊ शकतो. मला कोणती अडचण नाही असे सांगतानाच तुमच्यावर कोणाचा दबाव नसेल तर या अधिकाऱ्यावर कारवाई करा, असे आव्हान त्यांनी अनिल देशमुख यांना दिले. मला विधानभवन पायऱ्यांवर उपोषणाला बसायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला. यावर, कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात चालू अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here