नाणीज मठ येथील वारी कार्यक्रमासाठी परजिल्ह्यातून आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू


नाणीज मठ येथील वारी कार्यक्रमासाठी परजिल्ह्यातून आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.27 वा.सुमारास घडली.बाळासाहेब देवराम तळेकर (55,रा.ढोल्येवाडी मालवनगर राजापूर ता.संगमनेर,अहमदनगर) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मित्र एकनाथ देवराम लांडगे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, 6 फेब्रुवारी रोजी एकनाथ लांडगे यांच्यासोबत त्यांचे मित्र बाळासाहेब तळेकर हे नाणीज मठ येथे वारी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी दुपारी 11.15 वा.सुमारास बाळासाहेब तळेकर यां चक्कर आल्याने त्यांना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाली येथे दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना दुपारी 2.27 वा.सुमारास तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तळेकर यांना तपासून मृत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button